बंद घर फोडून ६४ हजारांची रोकड चोरी; खामगाव तालुक्यातील घटना!

 

खामगाव : – तालुक्यातील कोलोरी गावात बंद घर फोडून ६४ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सोनाजी अंभोरे (वय २४, रा. कोलोरी) हे १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ७ वाजता ते परत आले असता घरातील बेडरूममधील लोखंडी पेटी उघडलेली आढळली. पेटीत ठेवलेली सुमारे ६४ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!