Headlines

वादातून कोयत्याने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरातील घटना

 

खामगाव : जुन्या वादातून बर्डे प्लॉट परिसरात एका व्यक्तीवर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आला. तसेच, त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार रविवारी रात्री घडला असून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री सिमाबी मोहम्मद इरफान (३०, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) या घरासमोर पती मोहम्मद इरफान आणि दीर मोहम्मद इमरान यांच्यासोबत बोलत होत्या. त्यावेळी आरोपी सय्यद शाहरूख सय्यद फारूख याने ‘माझ्याविरोधात पोलिसात तक्रार का दिली?’ असे विचारून शिवीगाळ सुरू केली. सिमाबी यांच्या पतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने लोखंडी कोयत्याने मोहम्मद इरफान यांच्यावर वार केला. यावेळी आरोपीचा भाऊ सय्यद अरबाज सय्यद फारूख आणि वडील सय्यद फारूख यांनी देखील धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सय्यद शाहरूख, सय्यद अरबाज आणि सय्यद फारूख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!