खामगाव – शहरातील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या १९ वर्षीय युवकावर पोलिसांनी विनयभंग आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थिनी शहरातील एका शाळेत दहावीत शिक्षण घेत असून, गेल्या वर्षभरापासून प्रथमेश प्रभाकर चितोळे (वय १९, रा. सुटाळा बुद्रुक) हा तिचा सतत पाठलाग करीत होता. अखेर ४ फेब्रुवारी रोजी संत तुकाराम मंगल कार्यालयाजवळ त्याने तिचा हात पकडून धमकी दिली, “तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुला मारून टाकीन आणि स्वतः ही आत्महत्या करीन. याप्रकरणी विद्यार्थिनीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.