Headlines

झोपलेल्या इसमाच्या गळ्यातील सोन्याची चैन व पैसे लंपास.. तिघांवर गुन्हा दाखल; खामगाव शहरातील घटना

 

खामगाव :- येथील बाळापुर नाका परिसरातील अजय हॉटेलसमोर १७ जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला. निलेश वसंतराव गव्हाळ (४१, रा. जगदंबा रोड) हे रात्री १२.३० वाजता बाजीवर झोपले होते. मध्यरात्री १.३० वाजता जाग आल्यावर त्यांना त्यांच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, ५० हजार रुपये रोख व मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
चोरीचा संशय बळावल्यावर गव्हाळ यांनी तिन संशयितांचा पाठलाग केला. यावेळी एका व्यक्तीने मोबाईल खाली फेकून गव्हाळ यांना लोखंडी हत्याराने मारहाण केली व तिघे पळून गेले. संशयितांपैकी एका व्यक्तीचे नाव राज सुरखाडे (२१, रा. कोठारी फैल) असे आहे. निलेश गव्हाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रामेश्वर फासे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!