खामगाव :- खामगाव शहर पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याला वरिष्ठांशी असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
गजानन बोरसे, हे खामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी असून, त्यांच्याविरुद्ध वर्तणुकीबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या असभ्य वर्तणुकीमुळे वरिष्ठांशी संबंध बिघडल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. निलंबनाच्या कालावधीत गजानन बोरसे यांची बदली बुलढाणा येथील पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीची जबाबदारी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.