Headlines

डासाळा येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज

उदयनगर : – येथून काही अंतरावर असलेल्या डासाळा येथे ३८ वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (३० एप्रिल) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डासाळा येथील योगेश गणेश मते (वय ३८ वर्षे) यांनी आपल्या शेतात जाऊन नायलॉन दोरीच्या साह्याने टिन शेडवरील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, मानसिक तणाव किंवा आर्थिक अडचणी कारणीभूत असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथे पाठवला. पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. सुमेरसिंग ठाकूर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!