संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील एका गावात सार्वजनिक रस्त्यावरील पीठगिरणी जवळ १५ वर्षीय मुलाने १३ वर्षीय बालिकेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना २५ सप्टेंबरला सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना उघडकीस आली. गत अनेक दिवसांपासून एका १५ वर्षीय मुलाकडून १३ वर्षीय बालिकेचा पाठलाग सुरू होता.मुलीला माझ्यासोबत चल, तुला दुसऱ्या मुलासोबत लावून देतो, असे सांगून विनयभंग केला. २६ सप्टेंबरला पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून विधिसंघर्ष बालकाविरुद्ध कलम ७४, ७८ भारतीय न्याय संहिता सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.