Headlines

स्टेट बँक जवळ ऑटो चालकाला लुटले; तिघांवर गुन्हा दाखल; बुलढाणा शहरातील घटना

बुलढाणा: शहरातील स्टेट बँक ते जयस्तंभ चौकादरम्यान एका ऑटो चालकाला लुटल्याची घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. तीन आरोपींनी चालकाच्या खिशातील ४०० रुपये जबरदस्तीने काढून पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार योगेश रावसाहेब भालेराव (३६, रा. सम्यक नगर, सुंदरखेड) यांनी सांगितले की, तुळशीनगरमधून प्रवासी घेऊन जात असताना स्टेट बँकेजवळ तीन जण अचानक त्यांच्या ऑटोसमोर आले. प्रवाशांना उतरवून ते तिघे ऑटोमध्ये बसले आणि त्यानंतर चालकाच्या खिशातील ४०० रुपये बळजबरीने काढून पळून गेले. तक्रारीनुसार, आरोपींची नावे अल्तमश खान अमजद कान, शेख रिहान शेख असलम, आणि फरदिन खान नईम खान (सर्व रा. इकबाल नगर) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एएसआय नामेदव खवले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!