संग्रामपूर : – तालुक्यातील पिंगळी गावात राहणाऱ्या तिरुसिंग केकासिंग डावर (वय ४२) या इसमाने ४ जून रोजी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, तिरुसिंग डावर हे काही दिवसांपासून व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.
इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; संग्रामपूर तालुक्यातील घटना!
