Headlines

गजानन महाराज संस्थान पार्किंगमधून सेवाधाऱ्याची दुचाकी चोरीला

शेगाव – श्री गजानन महाराज संस्थानमध्ये सेवा देण्यासाठी आलेल्या सेवाधाऱ्याची दुचाकी पार्किंगमधून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ६ ते ९ एप्रिल दरम्यान घडली असून, याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवंता वसंता ताले (वय ४०, रा. बोरीअडगाव, ता. खामगाव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ६ एप्रिल रोजी ते संस्थानमध्ये सेवा देण्यासाठी आले असताना त्यांनी आपली काळ्या रंगाची, लाल पट्टा असलेली हीरो स्प्लेंडर प्रो (क्रमांक MH-28-AL-7168) दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, ९ एप्रिल रोजी दुचाकी परत घेण्यासाठी गेले असता ती पार्किंगमधून गायब होती. फिर्यादीने परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकी कुठेही सापडली नाही. अखेर अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकारामुळे संस्थान परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुचाकी चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!