Headlines

शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेला मारहाण ; आरोपी विरुद्ध गुन्हा नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा – शेती नावावर करून दे, या कारणावरून एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेला नातेवाईकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे ४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात कैलास पांडुरंग साबे (वय ४८, रा. अलमपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा नातेवाईक श्रीकृष्ण रामेश्वर साबे (रा. अलमपूर) याने त्यांच्या आई सुभाकलाबाई पांडुरंग साबे (वय ७५) यांच्यावर शेतीच्या मालकी हक्कासाठी दबाव टाकत शिवीगाळ व मारहाण केली. घटनेच्या वेळी तक्रारदार घरात नसताना आरोपी श्रीकृष्णने वृद्धेला “शेती माझ्या नावावर करून दे” अशी वारंवार मागणी केली. त्यावर वृद्ध महिलेने “कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर शेती नावावर करून देईन” असे सांगितले असता, संतापलेल्या आरोपीने तिला दगडाने मारहाण केली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!