Headlines

मलकापूर तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा!

मलकापूर : – तालुक्यातील हरसोडा येथे १७ वर्षीय युवकाने घरात गळफास घेतल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण संजय अढाव (वय १७, रा. हरसोडा ता. मलकापूर) हा इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. ५ मार्च रोजी दुपारी सुमारे १.३० ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान तो आपल्या घरात झोक्याच्या दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत सचिन गजानन अढाव (वय ३५) यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!