Headlines

आम्ही पोलीस आहोत; तुमचे अंगावरील दागिने काढून ठेवा, तोतया पोलिस बनून महिलेकडून 2 लाख 65 हजाराचे सोन्याचे दागिने लुटले!

भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळमध्ये दोन भामट्यांनी पोलिस असल्याचे सांगून एका महिलेची २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केली. ही घटना ५ डिसेंबर रोजी, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळील बस स्थानकाजवळ घडली.गुरुवारी सकाळी ९ वाजता वसंत जगन्नाथ पाटील (वय १९, आदर्श गल्ली, भुसावळ) आपल्या सोबत असलेल्या महिले सोबत दुचाकीने दीपनगर येथून जात असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. “आम्ही पोलीस आहोत, तुम्हांला शिट्टी मारली आहे, थांबलात का नाही? या रस्त्याने वृद्ध महिलेला लुटले गेले आहे, तुम्ही एवढे सोने घालून काय फिरत आहात?” असे सांगून, त्यांनी महिलेला विश्वासात घेतले.भामट्यांनी महिलेने अंगावर असलेले सोने रूमालात बांधण्यास सांगितले आणि विश्वास ठेवून महिलेने सोने काढले. त्यानंतर, त्यांनी “तुमचे सोने डिक्कीत ठेवून देतो” असे सांगून, जाणीवपूर्वक २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले.महिलेच्या सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे लक्षात आल्यानंतर, वसंत पाटील यांनी तातडीने भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काडेकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!