शेतात आंब्याच्या झाडाला गळफास; ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

सुनगाव (ता. जळगाव जामोद) : तालुक्यातील सुनगाव येथे एका ३६ वर्षीय तरुणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण प्रल्हाद दामधर (वय ३६, रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी २९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास कौलखेड शिवारातील स्वतःच्या शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतकाचा भाऊ संतोष प्रल्हाद दामधर (वय ४०) यांनी या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या तोंडी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कायम मर्ग क्र. १४/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएसएस प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीनकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शेख इरफान व संदीप रिंढे करीत आहेत. दरम्यान, प्रविण दामधर यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!