मोताळा : – तालुक्यातील टाकळी वाघजाळ येथे एका 29 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी उघडकीस आली. अंकुश प्रल्हाद हरमकार असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हरमकार यांनी त्यांच्या घरातील खांबाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि आजारपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.