एसटी स्थानकावर अल्पवयीन मुलीची छेडछाड; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव : शहरातील एसटी बस स्थानकावर गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही शेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती ७ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे शेगाव शहरातील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आली होती. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसह एसटी बस स्थानकावर गावी जाणाऱ्या बसची प्रतीक्षा करत उभी होती. त्यावेळी त्याच गावातील ओळखीचा असलेला पवन पंजाबराव इंगळे हा तेथे आला. फिर्यादीनुसार, त्याने मुलीची छेड काढत तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक २१०/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ चे कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!