Headlines

धावत्या टाटा मॅजिकला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही; रोहिणखेड येथील घटना

रोहणखेड – सुलतानपूर येथून रोहिणखेडकडे साड्या खरेदीसाठी निघालेल्या टाटा मॅजिक वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. रोहिणखेडनजीक पाण्याच्या टाकीजवळ ही घटना शनिवार, 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता घडली. वाहनचालक शेख इकबाल शेख हसन हे त्यांच्या मालकीच्या टाटा मॅजिक (MH-17-BX-3283) या वाहनासह जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित गाडी थांबवली व प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती. या दुर्घटनेमुळे वाहनमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!