Headlines

पत्रकार अजय टप यांना जीवे मारण्याची धमकी कंत्राटदारावर तातडीच्या कारवाईची मागणी

मलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात पत्रकारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुलढाणा रोडवरील दुभाजक सौंदर्यीकरणाच्या अंदाजे १.५ कोटी रुपयांच्या कामासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने पत्रकार अजय टप यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही घटना केवळ एका पत्रकारावर झालेला हल्ला नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारिता आणि लोकशाही मूल्यांवरचा थेट आघात असल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देताना संबंधित कंत्राटदाराने काही समर्थकांना सोबत घेतले होते, ज्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.

या प्रकरणात कंत्राटदारावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा २२ डिसेंबरपासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिक व पत्रकार संघटनांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!