Headlines

श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!

मलकापूर: श्रीसंत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १६ फेब्रुवारी रोजी विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकल माळवी सोनार समाज बांधवांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भक्तिभावाने सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संत नरहरी महाराजांच्या मंदिरातून वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य पालखी काढण्यात आली. पालखी सोहळ्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. नंतर मंदिरात समारोप सोहळा पार पडला, जिथे ह. भ. प. महंत नितिनदास महाराज यांनी कीर्तन सादर केले.

या प्रसंगी ह. भ. प. छोटे महाराज वाडे कुंड खुर्द, हभप पचाकर पाटील महाराज, हभप शिवाजी महाराज निशाणदार, संतोष महाराज ककडे तसेच कुंड खुर्द येथील भजनी मंडळ, मुद्गाचा गुरु हभप पचाकर पाटील आणि हभप प्रल्हाद ठोसगर बालोपाळ भजनी मंडळ यांनी सहभाग नोंदवला. या पुण्यतिथी सोहळ्यामुळे मलकापूर नगरी भक्तिमय वातावरणाने भारून गेली होती. भक्तगणांनी श्रद्धेने संत नरहरी महाराजांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!