मलकापूर : डब्ल्यू एच ओ तर्फे आंतरराष्ट्री स्तरावर आयोजित शिखर संमेलनात शहरातील वेदांश आयुर्वेद चे वैद्य अमित चौधरी यांची निवड करण्यात आली असून हा संमेलन दि. १७ ते १९ डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. अमित चौधरी यांची निवड ही आपल्या जिल्ह्यासाठी एक सन्मानजनक बाब ठरली आहे.
पारंपरिक औषध पद्धतींच्या वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तथा जागतिक आरोग्य व्यवस्थेत त्यांचा समावेश सुनिश्चित करणे. व गुणवत्तेच्या स्तरावर त्यांची सुरक्षा आणि प्रभावशीलता सिद्ध होण्याकरिता डब्ल्यू एच ओ तर्फे आंतरराष्ट्री स्तरावर संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते.या संमेलनात जगभरातील आरोग्य तज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि उद्योग प्रतिनिधी एकत्र येणार असतात. त्या अनुषंगाने नवी दिल्ली येथे “डब्ल्यू एच ओ ग्लोबल समिट ऑन ट्रॅडिशनल मेडिसिन” या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये देशभरातील विशेष निकषातून आयुर्वेद क्षेत्रातील काही वैद्यांची निवड करण्यात येऊन त्यांना बोलाविण्यात आले आहे. त्यातच वैद्य अमित चौधरी यांची निवड झालेली असल्याने जिल्ह्यासाठी कौतुकाची बाब ठरली आहे. वैद्य. अमित एस चौधरी हे वेदांश आयुर्वेद मल्टीस्पेशॅलीटी हॅास्पीटल चे संचालक असून, आयुर्वेदाचा प्रसार आणि विकास करणारे एक प्रख्यात तज्ञ आहेत, आणि ते मिनिस्ट्री ऑफ आयुष , तसेच सीसीआरएएस चे मान्यताप्राप्त सदस्य आहेत. त्यांची यांचे हे आमंत्रण केवळ त्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रतीक नाही, तर आयुर्वेदाच्या जागतिक प्रसारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या संमेलनातून मिळणारा अनुभव आणि ज्ञान आयुर्वेद क्षेत्राला पुढील संशोधन आणि विकासाच्या दिशेने मार्गदर्शक ठरेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.