Headlines

कोलते कॉलेजमध्ये डॉ. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने भावनांचा महापूर; विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा

(‘बाप’ या शब्दामागील संघर्ष, त्याग आणि प्रेरणेचे दर्शन; संपूर्ण कॅम्पस भारावला)

मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे आज सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेले “बाप समजून घेताना संघर्षातून यशाकडे” हे प्रेरणादायी विशेष व्याख्यान अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले. विशेष म्हणजे, हंकारे सरांचे ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. तेजस हिंगे यांच्या कडून ढोल-ताशा पथकाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला उत्सवी आणि प्रेरणादायी वातावरण लाभले. मान्यवर वक्ते श्री. वसंत हंकारे यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रा. संगीता खर्चे यांनी केले. सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते मा. श्री. वसंत हंकारे सर यांच्या ओघवत्या शैलीतील मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, कृतज्ञता आणि संघर्षाशी सामना करण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली. महाविद्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम दोन सत्रांत यशस्वीपणे पार पडला. सकाळी पदवी व पदवीका अभ्यासक्रमातील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी तर दुपारी ८वी ते १२वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले होते. दोन्ही सत्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, शहराध्यक्ष श्री. राजू पाटील, श्री. बंडूभाऊ चौधरी, डॉ. नितीन भुजबळ, तसेच पत्रकार श्री. हनुमान जगताप, श्री. धीरज वैष्णव, श्री. वीरसिंह राजपूत, श्री. राजू इंगळे, शेख निसार, प्रसन्न व्यवहारे, प्रदीप इंगळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

हंकारे सरांनी आपल्या व्याख्यानात वडिलांचे न सांगता येणारे कष्ट, कुटुंबासाठी केलेला त्याग, अपयशातून उभे राहण्याची जिद्द आणि यशासाठी आवश्यक असलेले मनोबल या विषयांवर अत्यंत प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. “वडील कमी बोलतात, पण त्यागात कधीच कमी पडत नाहीत,” हे वाक्य विद्यार्थ्यांच्या मनाला खोलवर भिडले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आय क्यू ए सी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे, प्रा. नितीन खर्चे, प्रा. सदाशिव लवांगे, प्रा. योगेश सुषीर, प्रा. जयप्रकाश सोनोने, प्रा. संतोष शेकोकर, प्रा. पांडुरंग चोपडे, प्रा. सचिन भोळे, प्रा. सुदेश फरपट, प्रा. महेश शास्त्री, प्रा. गजानन सुपे, डॉ. अमोघ मालोकर, प्रा. तेजल खर्चे, प्रा. मंजिरी करांडे, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. माधुरी राजपूत, प्रा. पूनम पट्ठे, प्रा. शिवानी राजपूत, प्रा. चैत्ताली नारखेडे यांच्यासह सर्व प्राध्यापकवर्ग व नॉन-टीचिंग स्टाफने मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अमोल तांबे व प्रा. रुपाली पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप पाटील यांनी अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे नमूद केले. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत, हा उपक्रम आयुष्याला दिशा देणारा ठरल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!