Headlines

मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण घडले कसे, बातमीत वाचा; तीन आरोपींवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल!

मलकापूर :- गंगेश्वर मंदिर परिसरात शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध पोस्को कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. मोहम्मद कलिम शेख कासम (वय 54, रा. छोटा बाजार, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या 13 वर्ष 11 महिने 19 दिवस वयाच्या मुलीला आज सकाळी सुमारे 8.30 वाजता शाळेत जात असताना संशयितांनी जबरदस्तीने लाल रंगाच्या चारचाकी वाहनात बसवून लैंगिक अत्याचाराच्या उद्देशाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सय्यद शाकेर वाहब (वय 20) इमान शिकिल्लोदिन सिद्दीकी (वय 20) आणि उबेद अहमदउल्ला पठाण (वय 19, तिघेही रा. माजलगाव, जि. बीड) या आरोपींविरुद्ध भा.दं.सं. कलम 137(2), 3(5), 74 बीएनएस तसेच पोस्को कायद्यातील कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून दाखल अधिकारी म्हणून पोहका सचिन पाटील यांनी नोंद केली आहे. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक केली असून शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!