मलकापूर :- येथील हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात 3 ऑक्टोबर 2024 रोजी शारदा मातेची स्थापना करण्यात आली. लेझीमच्या तालावर शारदा मातेचे स्वागत विद्यार्थिनींनी केले. स्थापनेनंतर भुलाबाईची गाणी घेण्यात आली. तीन दिवसात विविध स्पर्धांचे आयोजन शाळेत करण्यात आले. मलकापूर शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री चैनसुखजी संचेती, उपाध्यक्ष राजेश महाजन, सचिव अशोक अग्रवाल, संचालक मंडळ कमल किशोर टावरी , यांनी या तीन दिवसात शाळेला भेटी दिल्या. विद्यार्थिनींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. संस्कृती संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. माता सरस्वती हि विद्या, बुद्धि, ज्ञान आणि वाणीची देवी आहे. ती नेहमी शास्त्र ज्ञान देणारी आहे.विश्वाची निर्मिती हे वाग्देवीचे कार्य आहे. ती संपूर्ण जगाचा निर्माती आणि अधीक्षक आहे. वाग्देवीला संतुष्ट केल्यावर माणसाला जगातील सर्व सुखांचा अनुभव येतो. त्याच्या कृपेने माणूस ज्ञानी, वैज्ञानिक, गुणवंत, महर्षि आणि ब्रह्मर्षी होतो.
दिनांक 5 ऑक्टोबर 2024 शनिवारला माता शारदेचे पर्यावरणपूरक विसर्जन शाळेतच करण्यात आले. शारदोत्सव यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममताताई पांडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका सौ खडसे मॅडम, शारदोत्सव समिती अध्यक्ष श्रीमती नारखेडे मॅडम, हिराबाई संचेती कन्या शाळा व सरस्वती प्राथमिक कन्या शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी सर्व उत्साहाने सहभागी झाले.