Headlines

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी निलेश नारखेडे यांची नियुक्ती

मलकापूर :- शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन कार्य करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी निलेश नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे संघटनेचे सर्वे सर्वा खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष प्रकाश पोफळे यांनी पत्र देऊन घोषित केले.

मागील अनेक वर्षा पासून संघटने सोबत एकनिष्ठ राहुन निलेश नारखेडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावन्याचे कार्य केले आहे. तसेच त्यांनी तालुका प्रमूख म्हणून संघटन वाढिचे मोलाचे कार्य केल्याने त्यांची युवक जिल्हाअध्यक्ष पदी नेमणुक करण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना निलेश नारखेडे यांनी सांगितले की माझी नेमणुक केल्याने पुढील काळात खा. राजू शेट्टी व सर्वच वरीष्ठानच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात युवकांचे जाळे मजबूत करुण शेतकऱ्यांचा लढा आणखी तिव्र करू असे बोलून धन्यवाद व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!