Headlines

मलकापूरमध्ये २० हजारांच्या बदल्यात दोन लाख नकली नोटा देऊन फसवणूक करण्याचा डाव उघड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) बसस्थानक बाजूच्या गल्लीतील परिसरात अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद संतोष इंगळे (वय २३) आणि रोहित रतन महाले (वय २२, दोघे रा. भिमनगर, मलकापूर) अशी आरोपींची नावे आहेत. २९ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मलकापूर बसस्थानकाच्या मागील गल्लीत पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना १५ वर्षीय यश मदनलाल गडरोया (रा. नंदनगरी, दिल्ली) हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला. चौकशीत त्याने सांगितले की, आरोपींनी २० हजार रुपये दिल्यास ‘चिल्ड्रन बँक’चे दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश तायडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२), ६२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक वारे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!