Headlines

महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आपादग्रस्तांना तातडीने अर्थसहाय देण्यात यावे – अशांतभाई वानखडे यांची मागणी

मलकापूर (प्रतिनिधी) – महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आपादग्रस्तांना तातडीने अर्थसहाय देण्यात यावे अशी मागणी आज २१ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १२ ऑक्टोबर रोजी नळगंगा धरण मोठा प्रकल्प पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली व धरणाचे सर्व वक्रद्वारे एकाच वेळी उघडण्यात आल्याने शेलापूर,मलकापूर परिसर दाताळा आणि विकासनगर, रोहिदासनगर, ज्ञानेश्वरनगर, मातामहाकालीनगर, भीमनगर, जवाईनगर, रमाईनगर,सालीपुरा, नागेश्वर मंदिर, इस्लामपुरा, बरादरी परपेट लगतचे नदीकाठी असलेल्या वस्त्यांना या महापुराचा फटका बसून फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच १३ ऑक्टोबर रोजी सुध्दा झालेल्या ढगफुटीसदृष्य अतिवृष्टीने शहर व परिसरातील अनेकांचे घरात पावसाचे पाणी घुसल्याने संसारउपयोगी साहित्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या आपादग्रस्तांना तातडीने अर्थसहाय मिळणे आवश्यक आहे. तेव्हा तातडीने अशा आपदग्रस्तांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी समतेचे निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे, मोहन खराटे, दिलीप इंगळे, शे.इमरान शे.लुकमान, माझी खान, भारत महाले यांचेसह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *