मंगरुळ नवघरे :- येथील तरुण गोविंद सुरेश गायकवाड वय २६ वर्ष रा. मंगरूळ नवघरे हा बाबुळगाव शिवारांमधील त्याच्या शेताला लागून असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी १० वाजताच्या उघडकीस आले.
येथील शेतकरी संतोष छगन वाकडे हा सकाळी शेतामध्ये चक्कर मारत असताना एका आंब्याच्या झाडाला गोविंद गायकवाड हा गळफास घेऊन दिसून आल्यानंतर त्यांनी मंगरूळ येथील दीपक तांबट यांना फोन लावून सांगितले.
दीपक तांबट यांनी त्यांचा चुलत भाऊ दामोदर गजानन गायकवाड यांना फोनव्दारे कळविले की तुझ्या चुलत भावाने बाबुळगाव शिवारातील पंजाब उकडरा गाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतली.याबाबत फिर्यादी दामोदर गजानन गायकवाड वय २१ वर्षे यांनी १० डिसेंबर रोजी संध्याकाळी अमडापूर पोलीस स्टेशनला मर्ग नंबर ४३ / २०२४ कलम १९४ नुसार दाखल केला. अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळ बीड जमादार एसआय दिलीप तोंडे याबाबत पुढील तपास करीत आहेत.मृतकाच्या पश्चात भाऊ, आई-वडील, भाऊजी असा आप्त परिवार आहे.