Headlines

भरधाव दुचाकीची ऑटोला धडक, ऑटो उलटून चालकासह पाच जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : भरधाव पल्सर मोटरसायकलने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाले. हा अपघात २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बोदवड रोडवरील टॉवरजवळ घडला.पल्सर चालक सोपान कांडेलकर यांच्या निष्काळजीपणामुळे रिक्षातील प्रवासी अलका निकम, कैलास निकम, सुरेश अढाव, शोभा भगत, अनिता वराडे आणि रिक्षाचालक अशोक वराडे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमी सुरेश अढाव यांना अकोल्याला हलवण्यात आले.रिक्षाचालक अशोक वराडे यांच्या तक्रारीवरून पल्सर चालकावर मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!