Headlines

“आमदार राजेश एकडे यांच्या संवेदनशीलतेने कुटुंबाला दिलासा; तातडीच्या मदतीमुळे वाचले प्राण”

मलकापूर( उमेश इटणारे ):- कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. रस्त्यावर संचारबंदी असल्याने जनजीवन ठप्प झाले होते. रुग्णालये व आवश्यक सेवांशिवाय इतर सर्व हालचालींवर निर्बंध होते, त्यामुळे गंभीर परिस्थितीत असलेल्या अनेकांना वैद्यकीय उपचार घेण्यात अडचणी येत होत्या. त्याच काळात गोविंद राहाटे यांच्या भावाची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, लॉकडाऊनच्या कठोर नियमांमुळे प्रवास करणे अडचणीचे झाले होते, आणि एम्ब्युलन्सही उपलब्ध नव्हती.

गोविंद राहाटे यांनी त्यांच्या भावाच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण निराशा हाती येत होती. या संकटसमयी त्यांना आमदार राजेश एकडे यांची आठवण झाली आणि त्यांनी तातडीने आमदार एकडे यांना फोन केला. त्यांच्या या एका फोनवर आमदार एकडे यांनी तातडीने मदत करण्याचे ठरवले आणि त्यांच्या स्वतःच्या गाडीची व्यवस्था केली. गाडीच्या माध्यमातून ताठे नावाचे ड्रायव्हर केवळ 35 मिनिटांत उमाळी येथे पोहोचले, आणि गोविंद राहाटे यांचे भाऊ वेळेवर रुग्णालयात पोहोचले. यामुळे त्यांना योग्य उपचार मिळू शकले आणि आज ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

आमदार एकडे यांच्या सहृदयतेमुळे एका कुटुंबाला दिलासा मिळाला. आपल्या कामाचा कधीही गाजावाजा न करता, ते नेहमीच समाजासाठी कार्यरत असतात. “मी रुग्ण सेवा केली” असे त्यांनी कधीही सांगितले नाही, उलट त्यांनी नेहमीच हे आपले कर्तव्य म्हणून पार पाडले. आमदार राजेश एकडे यांचे काम खऱ्या समाजसेवेचा आदर्श आहे.
गोविंद राहाटे म्हणतात, “आमदार एकडे म्हणजे आमच्यासाठी देवदूतच. त्यांच्या तत्परतेमुळेच माझे भाऊ आज सुखरूप आहेत. अशा कठीण प्रसंगीही त्यांनी आमच्या मदतीसाठी जी धाव घेतली, ती त्यांच्या माणुसकीची आणि संवेदनशीलतेची साक्ष आहे. आमदार एकडे खरोखरच आमच्यासाठी आधार आहेत.”
ही दिलासादायक घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोक आमदार एकडे यांच्या कार्याची प्रशंसा करत आहेत आणि त्यांच्या मदतीच्या कार्याला आदर्श मानत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!