Headlines

शेतमजुराने उचलले टोकाचे पाऊल, विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या!

रिसोड : एका शेतमजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथे उघडकीस आली. नामदेव शंकर रांजवे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून याबाबत माहिती अशी की, नामदेव रंजवे हा २२ ऑक्टोबर पासून बेपत्ता होता घरच्यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो काही आढळून आला नाही. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भोकरखेडा शेत शिवारात लक्ष्मण नारायण रंजवे यांचे विहीरी जवळ नामदेव रंजवे यांचे बूट दिसून आले. विहिरीत पडताळणी केली असता नामदेव रवी याचा शव आढळून आला व बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती रिसोड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *