मलकापुर:- नांदुरा तालुक्यातील मेंढळी,जवळा बाजार, बेलुरा येथील विद्यार्थ्यांना नांदुरा बस स्थानकावर बस सकाळी साडेनऊ वाजता व सायंकाळी पाच वाजता ची करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजनेसह शिवसेना पदाधिकारी व उपरोक्त तिन्ही गावातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे, दिलेल्या वेळेत बस सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिलेला आहे, निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर ते पिंपळखुटा दुपारी 12 वा 45 जाणारी गाडी पुढे बेलुरा पर्यंत करण्यात यावी, नांदुरा ते मेंढळी साठी सकाळी साडेनऊ वाजता व सायंकाळी पाच वाजता च्या फेऱ्या करण्यात याव्यात तसेच कुऱ्हा काकोडा ते मलकापूर सकाळी 9;30 वाजता कुऱ्हा येथुन सोडण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या सह पदाधिकारी व ग्रामस्थांनी निवेदन दिले यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपुत, शिवसेना उप शहरप्रमुख शकील जमादार,शे.समद कुरेशी, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम,पवन गरुड, श्रीरंग बहुरूपे, नितीन सोयस्कार,सचिन दलाल, कैलास शिंगोटे, वासुदेव मुंडे, पंजाबराव धनोकार, सुधाकर वाघ, निवृत्ती धनोकार, दादाराव धनोकार,मुस्ताक पठाण,अशरदखान,फरदिन खान, इम्रान शेख, जुनेद खान,अयाज गौरी, मुश्ताक जमादार सह आदिंची उपस्थिती होती.