Headlines

शिवण क्लासला जाते म्हणून घरी परतलीच नाही, 19 वर्षीय तरुणी बेपत्ता ; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळाः शिवण क्लासला जाते असे सांगून तालुक्यातील चिंचपूर येथील १९ वर्षीय युवती घरून निघून गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.चिंचपूर येथील पदमाकर दिनकर बावस्कार यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की, त्यांची मुलगी मयुरी पदमाकर बावस्कार (वय १९) ही १८ ऑक्टोबर रोजी शिवण क्लासला जाते, असे सांगून घरुन निघून गेली. ती परत आली नसल्याने तिचा शोध घेतला अस असता ती आढळून आली नाही.

सदर युवतीने अंगात गुलाबी रंगाचा टॉप घातलेला असून उंची ५ फुट असून रंग सावळा आहे. अशा फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *