बुलडाणा :पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना काल 18 मे रोजी तालुक्यातील पांगरी येथे घडली. विजय रामकृष्ण गवई असे या युवकाचे नाव आहे. विजय गवई हा आज नळाचे पाणी भरत होता. या दरम्यान नळावर लावलेल्या वीजपंपाची पिन काढत असताना त्याला विजेचा जबर धक्का लागला. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच विजयला उपचारासाठी त्यांनी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत रायपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. विजय गवई याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवत होता.
मोटारीची पिन काढत असताना 26 वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू
