Headlines

विदया विकास माध्यमिक व उच्च विद्यालय, वाकोडी येथे राजमाता जिजाऊ व हिंदू धर्मप्रसारक स्वामी विवेकानंद जयंती संपन्न

मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास माध्यमिक व उच्च विद्यालय, वाकोडी येथे आज दि. 12 व 13 जानेवारी दरम्यान राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व हिंदू धर्म प्रसारक स्वामी विवेकानंद यांचा जयंती सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला. या सोहळ्या प्रित्यर्थ आयोजीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्य सौ. रेश्माताई पाटील ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव सौ. मंगलाताई पाटील ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा उद्योजगता पुरस्कार प्राप्त सौ. कोमलताई तायडे ह्या उपस्थित होत्या. तसेच सौ. सुनंदाताई पवार संस्था सदस्य, सौ. मधुमतीताई मानकर त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दिलीपकुमार अढाव व प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री. राहुल गायकवाड सर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या स्वागत सोहळ्यादरम्यान सौ. कोमलताई तायडे यांना युवा उद्योजगता पुरस्कार 2024-25 प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दिलीपकुमार अढाव यांनी केले. याप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद ह्यांच्या जीवन कार्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने उत्तम तयारी करून दिलेल्या भाषणांतून माहिती सादर केली. आपल्या मार्गदर्शनपर विचारातून सौ. कोमलताई तायडे ह्यांनी राजमाता जिजाऊ ह्यांनी छत्रपती कसे घडविले ह्यांचे उत्तम उदा. नी मार्गदर्शन केले तसेच स्वामी विवेकानंद ह्यांनी जगाला उद्देशून सांगितलेल्या पाच महत्वाच्या गोष्टी समजाविल्या. तर सौ. मंगलाताई पाटील ह्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद ह्यांच्या अस्तित्वामुळे झालेले परिवर्तन व त्यांचे अस्तित्व लाभले नसते तर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्याचे वर्णन करीत विद्यार्थ्यांना आवश्यक व अनमोल असे मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10 वी ची विष्यार्थी कु. वेदांगी पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन श्री. बी. व्ही. कुटे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!