Headlines

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचा सामाजिक उपक्रम: नायलॉन मांजापासून बचावासाठी मोटारसायकल स्वारांना दिला सुरक्षा कवच

मलकापूर:- मकर संक्रांतीचा हंगाम सुरू असून, पतंग उडवण्याचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. परंतु, नायलॉन मांजाचा वापर करताना अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. नायलॉन मांजामुळे अनेक नागरिकांचा गळा चिरला जाऊन मृत्यू झाल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला. आज, पोलीस स्टेशनच्या वतीने 100 मोटारसायकल स्वारांना त्यांच्या वाहनांना तार लावून संरक्षण कवच दिले. या उपक्रमामुळे मोटारसायकल स्वारांना नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुखापतींपासून संरक्षण मिळणार आहे. पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पी.एस.आय प्रशांत राठोड, ए.एस.आय. बाळू टाकरखेडे, हे.कॉ.  गणेश सूर्यवंशी, पो.कॉ. संदीप राखोडे, पो.कॉ. युसूफ शेख, पो.कॉ. भानुदास कऱ्हाडे, तसेच पोलीस मित्र अक्रम शहा यांची मोलाची साथ लाभली. नागरिकांनी पोलिसांच्या या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले आहे. “नायलॉन मांजामुळे कुणाच्या आयुष्यात संक्रांतीला काळोख येऊ नये” या भावनेने राबवलेला हा उपक्रम समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे. पोलीस प्रशासनाने दाखवलेली ही सामाजिक संवेदनशीलता खऱ्या अर्थाने मकर संक्रांतीला गोड करणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!