बाळापूर : – शहरातील स्टेट बँक रोडवरील शहा मेडिकल्सजवळ शुक्रवारी (दि. २४ जानेवारी) सकाळी ६० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन पडल्याने मृ-त्यू झाल्याची घटना घडली, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बाळापूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृ-त-दे-ह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, बाळापूर येथे पाठविण्यात आला. मृ-त व्यक्तीची ओळख पटली असून त्यांचे नाव रामदास दाजीबा सोळंके (वय ६०, रा. नागरतास, ता. मालेगाव, जि. वाशिम) असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले.
चक्कर येऊन पडल्याने ६० वृद्धाचा व्यक्तीचा मृ-त्यू, स्टेट बँक रोडवरील घटना!
