Headlines

बहिणीच्या हळदीच्या दिवशी दोन भावांचा अपघातात मृत्यू, लग्नासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाने दिली धडक

घारोड : हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लग्नासाठी आवश्यक साहित्य आणण्याकरिता लाखनवाडा येथे गेलेले दोन युवक अज्ञात – वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना २३ मे रोजी सकाळी उघडकीस – आली. अपघात घारोड ते लाखनवाडादरम्यान २२ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. घारोड येथील येथील सम्राट – रामेश्वर इंगोले (वय १७ वर्ष) व अजय – प्रल्हाद इंगोले (वय १७ वर्ष) यांच्या घरी गुरुवारला लग्नसोहळा होता. बुधवारी रात्री ९ वाजता हळदीचा कार्यक्रम आटोपून लाखनवाडा येथे दोघेही लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी मोटारसायकलने जात असताना डोंगराच्या खालच्या बाजूने त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये सम्राट इंगोले व अजय
इंगोले घटनास्थळावरच ठार झाले. दोन्ही युवकांचे कुटुंबीय लग्नाच्या धामधुमीत असल्याने अपघाताची माहिती मिळाली नाही. दोन्ही युवक रात्रभर घटनास्थळावरच पडून राहिले. गुरुवारी सकाळी माहिती मिळताच संपूर्ण गावातील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दोन्ही युवकांचे गावात प्रत्येकाशी चांगले संबंध होते. दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात शोकाकुल वातावरण होते.. घटनेचा पुढील तपास हिवरखेडचे ठाणेदार कैलास चौधरी, श्रीकांत चराटे, उमेश इंगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *