देऊळगावराजा : आदर्श नगर येथील रहीवासी बीफार्मसांचे शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय युवकांने स्वतःच्या घरात सिलिंग फॅनला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ऑक्टोबर २६ रोजी घडली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील आदर्श नगर येथील स्थानिक नगरपालिकेत कार्यरत असलेले संतोष राणोजी राघवन हे २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पत्नीसोबत शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांचा लहान मुलगा सुहास राघवन वय २२ वर्ष हा एकटा घरी होता. संतोष राघवन व त्याची पत्नी देवदर्शनावरून दुपारी दीडच्या सुमारास घरी परत आले असता घराच्या पाठीमागच्या रूममध्ये त्यांचा लहान मुलगा सुहास २२ सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आला. संतोष राघवन यांनी त्यांचे मावस भाऊ आसाराम गायकवाड वय ४८ वर्ष रा. भगवान नगर यांना बोलावून
घेऊन माहिती दिली. तर गजानन आसाराम गायकवाड ४८ वर्ष यांनी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे तक्रार दाखल केली. यावरून पोलीस निरीक्षक संतोष महाले यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल तपास करीत आहे. संतोषने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.