पातूर : तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनांतर्गत येणाऱ्या पांढूर्णा येथील विधवा महिला शेतकरी शशिकला साहेबराव शेळके (५४) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे घरच्यांनी सांगितले. शशिकला शेळके ह्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यात घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व शेतातील कोणत्याही प्रकारचे उत्पन्न होत नसल्यामुळे त्या नेहमी चिंताग्रस्त राहत होत्या. या विचारातच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. विधवा शशिकला शेळके यांच्या पश्चात दोन मुले आहेत.