Headlines

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चार संशयित चोरट्या महिलांना दुसरबीड येथील बाजारातून अटक !

बुलढाणा: प्रतिनिधी :- सचिन खंडारे

सिंदखेड राजा तालुक्यातील अतिशय महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसरबीड गावामध्ये दर मंगळवार ला आठवडी बाजार भरत असतो दुसरबीड गावाशी जवळपास ३० ते ३५ खेड्यांचा संपर्क येत असून मंगळवार २१ मे हा बाजाराचा दिवस असल्यामुळे सहाजिकच आठवडी बाजारात गर्दी नेहमीप्रमाणे झाली होती,याच गर्दीचा फायदा घेऊन चार अनोळखी महिला ह्या गर्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याच्या उद्देशाने बाजारामध्ये हालचाल करताना किनगाव राजा पोलिसांना आढळून आल्या,सदर महिला ह्या मंगळसूत्र चोरण्याच्या उद्देशाने बाजारात आल्याचा संशय काही नागरिकांना आल्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांची संपर्क साधला होता , किनगाव राजा पोलिसांनी चारही संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सीआरपी नुसार कलम १०९ अनन्वय कारवाई करून कोर्टात हजर केले आहे,या महिला गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोर असल्याची दाट शक्यता किनगाव राजा पोलिसांनी वर्तवली असून लोणार हद्दीत सुद्धा या महिलांनी चोरी केल्याचे दाट शक्यता आहे त्यामुळे त्यांना लोणार पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!