Headlines

शासकीय अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी – मलकापूर नगरपरिषदेच्या अभ्यासिकेचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे

मलकापूर (प्रतिनिधी) –मलकापूर नगरपरिषदेकडून “40-बिद्या” परिसरात स्पर्धा परीक्षार्थींसाठी शासकीय अभ्यासिका बांधण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अभ्यासिका सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

मलकापूर विधानसभा क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी मा. आमदार चैनसुख संचेती यांना अर्ज सादर करून अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, शासकीय अभ्यासिका सुरू झाल्यास त्यांना सुसज्ज वातावरणात अभ्यास करण्याची संधी मिळेल, जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासिकेच्या उभारणीसाठी नगरपरिषदेकडून भरीव निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थी वर्गामध्ये नाराजी आहे. आमदार संचेती यांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करावी, अशी विद्यार्थ्यांची विनंती आहे. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे आणि शासकीय अभ्यासिकेचे उद्घाटन लवकरात लवकर करावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!