Headlines

तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा; चिखली येथील घटना!

चिखली :- शहरातील भूषण प्रभुलाल पाराशर (वय २७) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार भूषणने घरातील स्वयंपाकघरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला आहे. भूषण पाराशर हे बसस्थानकाजवळील हनुमान मंदिर परिसरात पूजा साहित्य विक्रीचे काम करत होते. ते सोशल मीडियावरही सक्रिय होते. मात्र, त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्यापही समजू शकलेले नाही. याप्रकरणी पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!