मलकापूर :- उसनवारीचे राहिलेले पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर चार जणांनी शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रेमसुख चांगो काकर (रा. संताजी नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रकाश किसन लवटे याला त्यांनी उसनवारीने पैसे व काही वस्तू दिल्या होत्या. त्या पैशांची उर्वरित रक्कम मागण्यासाठी ते २७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजता गेले असता आरोपी प्रकाश लवटे याने शितल प्रकाश लवटे, विठ्ठल किसन लवटे व किसन लवटे (सर्व रा. विटाळी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांच्या समक्ष वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी चौघांनी मिळून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.