Headlines

भरधाव कारची स्कूलबसला जोरदार धडक; युवक ठार, प्रवासी बचावले, मोताळा नांदुरा रोडवरील घटना!

मोताळा :- मोताळा येथे २३ डिसेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एका ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मोहंमद मुसब अब्दुल जाबीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जळगाव जामोद येथील राणीपार्कमधील रहिवासी असलेले जाबीर हे स्कूलबस सहलीवरून परतत असताना गाडी गरम झाल्याने पाणी भरण्यासाठी थांबले होते.

महावितरणच्या १३२ केव्ही उपकेंद्राजवळ थांबलेल्या बसला नांदुऱ्याकडून भरधाव येणाऱ्या होंडा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात जाबीर बस आणि कारच्या मधोमध अडकून जागीच मृत्यूमुखी पडले.
कारचालक अखिलेश विजय चौधरी (रा. नांदुरा) याच्याविरुद्ध लइक अहेमद अब्दुल खालिक देशमुख यांच्या तक्रारीनंतर बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बसमधील इतर प्रवासी सुदैवाने सुखरूप असल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते अपघातांमधील निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम पुन्हा समोर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!