नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एका ढाब्यावर जेवण करत असलेल्या ट्रकचालकावर तिघांनी हल्ला करून त्याच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान फिरोज खान (वय ३४, रा. सुरत, गुजरात) हे ट्रकचालक ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा आपल्या मित्रासह ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपींनी विनाकारण वाद घालत त्यांच्याशी शिवीगाळ केली आणि त्यानंतर मारहाण केली.
या मारहाणीत आरोपींनी त्यांच्या खिशातील सुमारे १५ हजार रुपये रोख रक्कम तसेच गळ्यातील अंदाजे २ तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. या घटनेत एकूण सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी अरमान कुरेशी, अल्ताफ कुरेशी आणि शेख राजीक शेख रफीक (सर्व रा. मलकापूर, पारपेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.