बुलढाणा :- बुलढाणा जिल्हा न्यायालय परिसरातून बॅटरी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली, जेव्हा जनरेटर सुरू करण्यासाठी कर्मचारी गेले. तेव्हा जनरेटरची बॅटरी गायब असल्याचे लक्षात आले.
या घटनेबाबत भूषण चोपडे यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.चोरी नेमकी कधी आणि कशा प्रकारे झाली, याचा तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत. न्यायालय परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतल्या जात आहेत.