खामगावः स्थानिक मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पिशवी कापून पाकीट लंपास करण्यात आले. तक्रारीनुसार, अकोला येथील आशा गजानन ददगाळ या महिलेने बुधवारी खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील एका सराफा व्यावसायिकाकडून सोन्याचे दोन मंगळसूत्र आणि चार मणी खरेदी केले. खरेदी केलेले सोने एका पिशवीतील पाकिटात टाकले. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची पिशवी कापून पाकिटातील रोख ५०० रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण १५ हजार १५२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ रामेश्वर फासे करीत आहेत.