मलकापूर :- तालुक्यातील झोडगा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सिमेंट पोल पाडून वीज तारांची सुरू असलेली चोरी अखेर ग्रामस्थांनी थांबवली. सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांनी एकत्र येत रात्रीच्या सुमारास पोल पाडून तारा चोरणाऱ्या सहा चोरट्यांपैकी चार जणांना पकडले व त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर उर्वरित दोघांना गंभीर मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चोरट्यांमुळे झोडगा शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत होऊन शेतीला मोठा फटका बसत होता. अनेक वेळा तक्रार देऊनही वीज वितरण कंपनी आणि पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी कठोर पाऊल उचलले. आता या प्रकाराला कायमचा आळा बसावा यासाठी मलकापूर शहर, ग्रामीण व एमआयडीसी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
सिमेंट पोल पाडून वीजतारा चोरणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून धो-धो धुतला; दोघे रुग्णालयात दाखल; मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील घटना
