Headlines

अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल; आरोपींमध्ये मलकापूरचे दोन तर खामगावच्या तीन जणांचा समावेश

खामगाव :- शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासानुसार, मलकापूर येथील १७ वर्षे ११ महिने वयाच्या पीडितेचा बालविवाह अजय मेंडे (२५, रा. मलकापूर) याच्यासोबत घडवून आणला. १९ मे २०२४ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. विवाहानंतर अत्याचार झाल्यामुळे मुलगी गर्भवती झाली आणि ३१ मार्च रोजी तिला प्रसूतीसाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारांसाठी अकोला येथे हलविण्यात आले, जिथे तिने मुलाला जन्म दिला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून आरोपी अजय मेंडे याच्यासह लक्ष्मीबाई मेंडे (मलकापूर), राहुल जानराव मोरे, वर्षा राहुल मोरे, लता योगेश बेलकर (सर्व रा. खामगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२), पोक्सो कायद्यांतर्गत कलम ४, ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे विविध कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!