पिकाला पाणी देण्यासाठी मोटर’ चालू करत असताना ‘शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव: तालुक्यातील राहुड शिवारात शेतातील इलेक्ट्रीक मोटर सुरू करताना शॉक लागून अशोक देविदास चव्हाण (४२) यांचा मृत्यू झाला. हे दुर्दैवी घटना ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली. चव्हाण हे कुन्हा पारखेड येथील रहिवासी होते आणि शेताला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करत होते. यावेळी शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेबाबत चव्हाण यांच्या कुटुंबाने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोस्टेमध्ये कलम १९४ आणि मर्ग दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!